पंतप्रधानांकडून ठोस कार्यवाही नाही?

वास्को अग्निकांडानंतर प्रभव नायक यांचा गंभीर सवाल
————————————————–

गांवकारी, दि. २९ :
गोव्यातील सुरक्षा नियम, त्यांची अंमलबजावणी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचे सर्वंकष लेखापरीक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी डिसेंबर २०२५ मध्ये पंतप्रधानांकडे केली होती. मात्र, अद्याप या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे.

वास्कोतील भीषण अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर नायक यांनी पुन्हा एकदा या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. या दुर्घटनेमुळे राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोव्यातील सर्व क्षेत्रांमधील सुरक्षा व्यवस्था, नियमांचे पालन आणि संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणणे गरजेचे असल्याचे नायक यांनी स्पष्ट केले.

लोकांचे जीव आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी केवळ आश्वासने नव्हे, तर ठोस उपाययोजना आवश्यक आहेत, असे सांगत प्रभव नायक यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

  • Related Posts

    कोडलीतील खाणकामाच्या त्वरीत चौकशीची मागणी

    ओपा जलप्रकल्पालाही संभाव्य धोका गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) सांगे तालुक्यातील कोडली येथे खांडेपार- दुधसागर नदीच्या पात्रापासून अवघ्या १५ ते २० मीटर अंतरावर मोठे पाण्याने भरलेले खाण खंदक असल्याचा आरोप करण्यात…

    मैदानात यशचा डंका; सरकार दरबारी मात्र उपेक्षाच !

    कोपनहेगन ओपन स्क्वॉश स्पर्धेत यश फडतेला विजेतेपद; ऑलिंपिकच्या स्वप्नासाठी सरकारी मदतीची प्रतीक्षाच गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धांमध्ये गोव्यासह भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या यश फडतेच्या वाट्याला मैदानात यश, तर…

    You Missed

    29/10/2026 e-paper

    29/10/2026 e-paper

    वास्कोतील अग्नितांडवात व्यापार बेचिराख

    वास्कोतील अग्नितांडवात व्यापार बेचिराख

    आगलावे सरकार!

    आगलावे सरकार!

    पंतप्रधानांकडून ठोस कार्यवाही नाही?

    पंतप्रधानांकडून ठोस कार्यवाही नाही?

    एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने समाजाचा विश्वासघात केला : विजय सरदेसाई

    एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने समाजाचा विश्वासघात केला : विजय सरदेसाई

    ₹16-Crore Janjati Gaurav Celebrations Under Scanner; Congress Alleges Massive Irregularities

    ₹16-Crore Janjati Gaurav Celebrations Under Scanner; Congress Alleges Massive Irregularities