पाटकर – चोडणकर संघर्षाला प्रभारी जबाबदार !

काँग्रेस हायकमांडच्या दुर्लक्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी)

राज्यात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती उद्भवण्यास हायकमांड आणि राज्यात पाठवले जाणारे प्रभारी जबाबदार आहेत. अमित पाटकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून गिरीश चोडणकर गटाने त्यांच्या विरोधात असहकार्याचे धोरण स्वीकारले. या संघर्षात प्रभारींनी हस्तक्षेप करून समेट का घडवून आणला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
राज्यात एकीकडे भाजपच्या जुलमी राजवटीपासून लोकांना मुक्तता हवी आहे, तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस मात्र अंतर्गत संघर्षात अडकला आहे. ही परिस्थिती दुर्दैवी असल्याचे पक्षातील काही कार्यकर्ते बोलू लागले आहेत. लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याऐवजी आणि भाजपच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश करण्याऐवजी काँग्रेसचे नेते दिल्लीत आपल्या पक्षातील एकमेकांचे वाभाडे काढण्यात मग्न आहेत. पक्षातील सध्याच्या घडामोडी कार्यकर्ते आणि जनतेसाठी अत्यंत निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
ठाकरे आणि निंबाळकर अपयशी
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सह-प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी गेल्या तीन वर्षांत तळागाळातील संघटन उभारणीसाठी ठोस पावले उचलली नाहीत. सर्वांना एकत्र आणून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून यशस्वी प्रयत्न झाले नाहीत. केवळ बैठका घेणे आणि दिल्लीवरून आलेले कार्यक्रम राबविणे इतपतच त्यांची भूमिका मर्यादित राहिली, अशी स्पष्ट टीका स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.
दिल्लीत पक्ष नेतृत्वबदलाची चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवर कुणालाही विश्वासात घेतले जात नसल्याची भावना निर्माण झाली आहे. पक्षाचे आमदार आणि खासदारांनाही श्रेष्ठींकडून विचारले जात नसल्यामुळे “नेमके काय चालले आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या एकूण प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. जर फक्त गिरीश चोडणकर यांनाच निष्ठावंत कार्यकर्ते मानले जात असतील, तर उर्वरित नेते, कार्यकर्ते, विद्यमान तीन आमदार आणि खासदार यांचे नेतृत्व कौशल्य, योगदान आणि निष्ठा गौण ठरते का? तळागाळात काम करणारे इतर नेते हायकमांडच्या नजरेत का येत नाहीत? भाजपविरोधातील जनतेची नाराजी असूनही काँग्रेसला त्याचा लाभ घेता आलेला नाही. गटबाजी आणि निष्क्रियतेमुळे पक्ष भरकटत चालला आहे.
आज जर काँग्रेसला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर व्यक्तिनिष्ठ निर्णय न घेता सामूहिक नेतृत्व आणि तळागाळातील नेते व कार्यकर्त्यांचा सन्मान हीच खरी गरज आहे, असा ठाम सूर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात उमटत आहे.

  • Related Posts

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    Social and environmental activist Prof. Ramrao Wagh has called upon the people of Goa to unite against the State Government’s proposal to declare 56 villages as “Urban Areas”, warning that the move would irreversibly damage Goa’s rural character, agriculture and fragile environment.

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    पेडणे,दि.२५ जून: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (NH-66) वरील उगवे आणि तांबोसे दरम्यान असलेल्या तांबोसे पुलावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका…

    You Missed

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    Brutal Murder of Senior Citizen Sparks Outrage in Goa

    Brutal Murder of Senior Citizen Sparks Outrage in Goa

    25/06/2026 e-paper

    25/06/2026 e-paper

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    नामस्मरण !

    नामस्मरण !