फोंड्यावर २०२७ ची चाचपणी


अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

गांवकरी, दि. ३० (प्रतिनिधी)

फोंडा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची चाचपणी घेण्याचे ठरवले आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे तीन दिवसांच्या गोवा भेटीवर दाखल झाले आहेत. या तीन दिवसांत ते फोंडा मतदारसंघात दौरा करून अधिकाधिक मतदारांना आपकडे वळविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. भाजपतर्फे रितेश नाईक, काँग्रेसतर्फे डॉ. केतन भाटीकर आणि आपतर्फे गीतेश नाईक हे उमेदवार आहेत. गीतेश नाईक यांच्या प्रचारासाठी आप पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. २०२२ च्या निवडणुकीत केवळ ६२० मते मिळवलेल्या आप पक्षाने यावेळी चमत्कार घडवून आणण्याचा निर्धार केला आहे. निवडणूक व्यवस्थापन, शिस्तबद्ध आणि प्रभावी प्रचार यांचा वापर करून काँग्रेस आणि भाजपला धक्का देण्याचे नियोजन या पक्षाने केले आहे.
केजरीवालांनी घेतले ब्रह्मेशानंदाचार्यांचे आशीर्वाद
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तसेच पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तीन दिवसांच्या गोवा भेटीवर आले आहेत. त्यांनी राज्यात दाखल होताच कुंडई येथे श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी गोवा प्रभारी अतिशी, फोंड्याचे उमेदवार गीतेश नाईक, राज्याध्यक्ष वाल्मिकी नाईक, संदेश तळेकर देसाई आदी उपस्थित होते.
भाजप बिनधास्त, काँग्रेस चिंतातूर
आपच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. आपच्या उमेदवारीचा फटका काँग्रेसला बसणार आणि रितेश नाईक यांचा विजय सुकर होणार, असे भाजप नेते बोलत आहेत. काँग्रेस पक्षातील नेते मात्र चिंतातूर झाले आहेत. आपमुळे काँग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन भाजपला मदत होईल आणि त्यामुळे आप पक्ष हा भाजपसाठीच वावरतो आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
आप पक्षाकडून मात्र हे दोन्ही दावे फेटाळले जात आहेत. वास्तविक भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकांना आत्तापर्यंत फसवत आले आहेत. लोकांना याची जाणीव करून देणे आणि तिसऱ्या पर्यायाचा गंभीरपणे विचार करावा या हेतूनेच आप पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरला आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीतर्फे देण्यात आली आहे.

  • Related Posts

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    शेतकऱ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) गेल्या शंभर वर्षांपासून कसत असलेल्या आल्वारा जमिनी, गांवठण जमीनी, वन्यजीव क्षेत्रातील जमिनी, मोकासो जमिनी आदी विषयांवरून आणखी किती पिढ्या प्रतीक्षा करायची, असा…

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    Over 1,500 Alvara holders yet to apply for regularisation; farmers seek Class-I occupancy rights, relaxation of documentation requirements and extension of application deadline

    You Missed

    15/10/2026 e-paper

    15/10/2026 e-paper

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    आदिवासी निधीतील कथित गैरव्यवहारावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

    आदिवासी निधीतील कथित गैरव्यवहारावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल