सावंत – राणे मनोमिलनासाठी भाजपचे प्रयत्न

भाजप संघटन सचिव शिवप्रकाश यांची मध्यस्ती
———————————————————————————————————
गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील कथित मतभेद दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपचे नवनियुक्त संघटन सचिव शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत सावंत आणि राणे यांची राणे यांच्या खासगी निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राणे यांनी मुख्यमंत्र्यांना विशेष निमंत्रण दिल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाल्याचे वृत्त ‘गोवा न्यूज हब’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.

दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत मतभेद पक्षाच्या निवडणूक कामगिरीवर परिणाम करू शकतात, अशी चिंता भाजपला आहे. त्यामुळे मनोमिलन घडवून आणून पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे समजते.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत हेही विश्वजीत राणे यांना आपल्या निवासस्थानी चर्चेसाठी निमंत्रित करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकांमधून दोन्ही नेत्यांमधील मतभेद दूर होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे तीन महिन्यांत देतो!

    पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे वनमंत्र्यांना आव्हान ————————————————————————————————– गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) म्हादई अभयारण्यातील वाघाच्या चित्रफितीवरून वनमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या दाव्याला पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी आव्हान दिले आहे. संबंधित चित्रफीत…

    दिलेश तेली याला ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न

    खासदार विरियातो फर्नांडिस यांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) : होर्मुझ सामुद्रधुनीत क्षेपणास्त्र हल्ल्याचा फटका बसलेल्या ‘तारा गॅस’ या एलपीजी जहाजावरील गोमंतकीय खलाशी दिलेश चंद्रकांत तेली यांना ओमानमधून सुरक्षित…

    You Missed

    24/11/2026 e-paper

    24/11/2026 e-paper

    वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे तीन महिन्यांत देतो!

    वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे तीन महिन्यांत देतो!

    सावंत – राणे मनोमिलनासाठी भाजपचे प्रयत्न

    सावंत – राणे मनोमिलनासाठी भाजपचे प्रयत्न

    पर्वरी उड्डाणपुल वाहतुकीचा घोळ कायम

    पर्वरी उड्डाणपुल वाहतुकीचा घोळ कायम

    50 Years of Mining Leave Sirigao With ₹4,000 Crore Environmental and Social Debt: Study

    50 Years of Mining Leave Sirigao With ₹4,000 Crore Environmental and Social Debt: Study

    बिसलेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित; एफएसएसएआयच्या नोटिशीवर कंपनीचे स्पष्टीकरण

    बिसलेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित; एफएसएसएआयच्या नोटिशीवर कंपनीचे स्पष्टीकरण