विनयभंग, अपहरण आणि बरेच काही…

महिलेच्या तक्रारीवरून मुरगांवात एकच खळबळ

वास्को,दि.२२(प्रतिनिधी)

मुरगांव तालुक्यातील एका बहुचर्चित पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच आणि त्यांचे खाजगी व्यवस्थापक यांच्याविरोधात विनयभंग, अपहरण तसेच इतर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करणारी तक्रार एका पीडित महिलेने वेर्णा पोलिसांकडे इमेलद्वारे दाखल केली आहे. आपल्या जिविताला धोका असून पोलिसांकडून सुरक्षेची हमी मिळाल्यास जबानीसाठी हजर राहणार असल्याचेही या महिलेने कळवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
इमेलव्दारे तक्रार आणि व्हायरल व्हिडिओ
सदर पीडीत महिलेने आपली तक्रार इमेलद्वारे वेर्णा पोलिस निरीक्षक, पोलिस महासंचालक आणि दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना पाठवली आहे. यापूर्वी तिने आपल्या पतीच्या फेसबुकवर काही व्हिडिओ तयार करून त्यात या दोघाही संशयीतांचा भांडाफोड केला आहे. हे व्हिडिओ सध्या मुरगांव तालुक्यात बरेच व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे तिच्या पतीचे अपहरण करून त्याला पाच दिवस बंदिस्त ठेवून मारहाण केल्याचा आरोप तीने केला आहे तसेच तिचा विनयभंग केल्याचा ठपकाही तीने ठेवला आहे. या दोन्ही संशयीतांचे बेकायदा धंदे आणि व्यवहारांचा पर्दाफाशही तीने या व्हिडिओतून केला आहे.
संशयीतांची पूर्वीच तक्रार
या महिलेने केलेल्या तक्रारीत ज्या दोन संशयीतांची नावे आहेत, त्यांनी सात दिवसांपूर्वीच सदर महिला आणि तिचा पती यांच्यावर पैशांचा गैरव्यवहार केल्याचा तसेच पैसे घेऊन पळाल्याची तक्रार नोंद केली आहे. ही तक्रार खोटी असून लवकरच सत्य बाहेर येईल,असे संकेत तक्रारदार महिलेने दिले आहेत.
भाजपचा पदाधिकारी
सदर तक्रारीतील प्रमुख व्यक्ती म्हणजे माजी सरपंच आणि विद्यमान पंच हे भाजपचे पदाधिकारी आहेत. या व्यतिरीक्त मुरगांवच्या एका बड्या राजकीय नेत्याच्या अत्यंत विश्वासातील ही व्यक्ती अशी त्याची ओळख आहे. या व्यतिसाठी सदर राजकीय नेता काहीही करू शकतो,अशीच त्याची प्रतिमा आहे. अशावेळी पोलिसांकडून खरोखरच निपक्षपाती चौकशी होऊ शकते काय,असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गोमंतकीय नाव पण भाषा परप्रांतीय
सदर महिलेचे नाव हे गोमंतकीय असले तरी तीची बोलण्याची भाषा ती परप्रांतीय असल्याचे दर्शवते. तीला पोलिसांकडे तक्रार केल्यास संपवणार असल्याची धमकी मिळाल्याची खबर आहे. वेर्णा पोलिसांनी तीला फोन करून तीच्याशी संपर्क साधला आणि तिला जबानीसाठी पोलिस स्थानकावर बोलावले परंतु आपल्या जिविताला धोका असून पोलिस हमी घेत असतील किंवा सुरक्षा देत असतील तरच आपण येऊ शकते,असेही तीने आपल्या संदेशात म्हटले आहे.

  • Related Posts

    स्थलांतरित वोटबँक: ड्रामाबाजी बंद करा !

    मनोज परब यांनी साधला भाजपवर निशाणा गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) परराज्य दिवस साजरा करण्याच्या बहाण्याने परप्रांतीय मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपकडून गोंयकारांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना स्थलांतरित मतदारांची…

    रेती, चिरे, ट्रक व्यावसायिकांना सोडले वाऱ्यावर

    मिशन फॉर लोकल, पेडणेचे राजन कोरगांवकर यांचा आरोप गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील रेती, चिरे तसेच ट्रक व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडून सरकार परप्रांतीय व्यावसायिकांना प्रोत्साहन देत असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    14/04/2025 e-paper

    14/04/2025 e-paper

    संघटीत व्हा, संघर्ष करा!

    संघटीत व्हा, संघर्ष करा!

    स्थलांतरित वोटबँक: ड्रामाबाजी बंद करा !

    स्थलांतरित वोटबँक: ड्रामाबाजी बंद करा !

    तुला व्हावेच लागेल आंबेडकरवादी !

    तुला व्हावेच लागेल आंबेडकरवादी !
    error: Content is protected !!